रत्नोदय क्रेडीट सोसायटीच्या आळते शाखेचा शुभारंभ ;

ठेवीदारांनी साधला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त …

हातकणंगले / प्रतिनिधी
      रत्नोदय को-ऑप क्रेडीट सोसायटी वळीवडे या संस्थेच्या आळते (ता. हातकणंगले) कलेक्शन शाखेचा शुभारंभ प.पू. जगद्‌गुरू स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते झाला. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ जि. प. सदस्य अरुणराव इंगवले होते.

    उद्‌घाटन कार्यक्रमास आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले , वडगांव बाजार समितीचे संचालक किरणराव इंगवले , हातकणंगलेचे नगरसेवक राजेंद्र इंगवले , हातकणंगले पं. स. चे उपसभापती प्रविण जनगोंडा , अमर इंगवले , उपसरपंच अमित पाटील , को. जि. पतसंस्था फेडरेशनचे संचालक व माजी सरपंच संजय दिक्षीत, बाळासाहेब पाटील (दादा) आळते हायस्कूलचे चेअरमन संजयकुमार पाटील, किसान दूध संस्थेचे चेअरमन सुभाष करके , शेतकरी दुध संस्थेचे चेअरमन बाळगोंडा पाटील , बळीराजा दूध संस्थेचे चेअरमन सुनील पाटील , कुंथुंसागर पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन माणिक संकाण्णा , जलगंगा पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन आण्णासो चौगुले , पोलीस पाटील रियाज मुजावर , पद्मावती पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन महावीर मजलेकर , ग्रा. प. सदस्य वसंत उर्फ अजित कोळाज, रोशन कांबळे , संतोष कांबळे , विकी कांबळे , हातकणंगले कॉंग्रेस ओबीसी संघटनेचे तालुकाध्यक्ष शकील अत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती .
       संस्थेचे चेअरमन राजगोंडा वळीवडे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमास व्हा. चेअरमन चंद्रकांत पाटील, व्यवस्थापक महावीर टारे , संचालक राजाराम तांबवे , महावीर पाटील , विलास पाटील , अमोल चौगुले , रावसाहेब चव्हाण , उत्तम कुंभार , अमोल पाटील , राहुल पाटील , सुनील पोवार , संजय चव्हाण , अजित दिगंबरे , संचालिका जमीला मुजावर , प्रिया भबान यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

ठेवीदारांनी साधला उत्साहात दसऱ्याचा मुहूर्त …
रत्नोदय को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या शुभारंभ दिनी आळते येथील शेकडो ठेवीदारांनी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या दिवशी लाखो रुपये संस्थेत ठेवी ठेवुन संधी साधली. यावेळी ठेवीदारांमध्ये कमालीचा उत्साह होता. 

error: Content is protected !!