चंदूर / ता : ९- वार्ताहर

चंदूर ( ता. हातकणंगले ) येथील सामाजीक कार्यकर्ते व उद्योजक पोपट उर्फ रविंद्र शिवगोंडा पाटील यांचे (वय -58 वर्ष )अल्पशा आजाराने निधन झाले. पंचायत समितीचे माजी सभापती सौ. शुभांगी पाटील यांचे पती होत .
पाटील गेल्या पंचवीस वर्षापासुन कट्टर आवाडे गटाचे समर्थक होते. गावामध्ये विवेकानंद पतसस्था व जय किसान सेवा सोसायटीमध्ये संचालक होते. नेहमी ते स्व:ताचा व्यवसाय सांभाळत पंचायत समितीच्या माध्यमातुन अनेक गोरगरीबांना मदतीचा हात देत होते . तसेच अनेक गरजूना आर्थिक मदतही करीत असत. त्यांच्या निधनाने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे . त्यांच्या पश्चात आई , वडील , पत्नी , दोन मुले , सुना व नातवंडे असा परिवार आहे .