रिझर्व्ह बँकेचे नूतन बँकेचा परवाना रद्द करण्याचे आदेश

पुरेसे भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याने येथील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहेत. प्रशासक नेमलेल्या या बँकेवर आरबीआयने केलेल्या कारवाईमुळे शहर व परिसरातील बँकिंग क्षेत्रात खळबळ माजली आहे. आरबीआयने बँकेला ४ डिसेंबर २०२३ पासून सर्व प्रकारचे व्यवसाय बंद करण्याचे आदेशही दिले आहेत.
शंकरराव पुजारी यांच्या निधनानंतर चेअरमनपदाची धुरा प्रकाश पुजारी यांनी स्वीकारली. मध्यंतरीच्या काळात बँकेतील कामकाजात आलेली शिथिलता, नियमबाह्य कामकाज आणि कर्जवाटप आदी कारणांनी बँकेला घरघर लागली. १३ मे २०२२ रोजी रिझर्व्ह बँकेने नूतन बँकेच्या कामकाजावर निर्बंध लादत प्रशासकाची नेमणूक केली होती.

error: Content is protected !!