चांगले विद्यार्थी घडविण्याची शिक्षकांसोबत पालकांची जबाबदारी – लेखा मिणचेकर

  आजच्या इंटरनेटच्या युगात शालेय मुले व मुली मोबाईलचा वापर इतका करतात कि ते मोबाईल शिवाय राहूच शकत नाहीत अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, पण यातून त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी ही शिक्षकांपेक्षा पालकांचीच जास्त प्रमाणात आहे असे मत महिला विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. लेखा मिणचेकर यांनी व्यक्त केल्या त्या इचलकरंजी येथील जे.के.इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्यात कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध अभीनेत्री चिन्मयी सुमित या उपस्थित होत्या. 

यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. मुलांना शाळेत घातले म्हणजे पालकांची जबाबदारी संपली असे होत नाही तर आपणही घरात मुले अभ्यास करतात का नाहीत याकडे लक्ष दिले पाहिजे. एखादी महागडी वस्तू जपण्यासाठी कशी काळजी घेतो, तशी मुलांची काळजी घ्यावी त्यांच्यावर केवळ रागा-राग न करता त्यांना समजावून सांगावे.

आज आपला मुलगा शिकून एक मोठा अधिकारी, उद्योगपती, डॉक्टर किंवा वकील झाला पाहिजे असे प्रत्येक पालकांना वाटते. यासाठी मुलांना घडवण्याची जितकी जबाबदारी शिक्षकांची असते तितकीच जबाबदारी ही पालकांचीही असते असे लेखा मिणचेकर यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमास चंदुरचे उपसरपंच संदीप कांबळे, साजणी मा.सरपंच दिनकर कांबळे, प्रा.अमर कांबळे , संतोष कांदेकर, ग्रा.सदस्या कबनुर सौ. सुलोचना कट्टी, संपादक रविंद्र कांबळे, स्कुलचे चेअरमन विशाल साजणीकर सोबत इतर मान्यवर शिक्षक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!