मतदार याद्यांचा सुधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

कोल्हापूर :
भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. आता या पुनरीक्षण कार्यक्रमाचा सुधारित आराखडा आयोगाने जाहीर केला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली आहे

भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात पुढील सुधारणा केल्या असून सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे – दावे व हरकती निकाली काढणे – सध्याचा कालावधी- दि. २६ डिसेंबर २०२३ पर्यंत (मंगळवार), सुधारित कालावधी -१२ जानेवारी २०२४ (शुक्रवार).
मतदार यादीचे हेल्थ पॅरामीटर तपासणे आणि अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी घेणे व डेटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी यादीची छपाई करणे- सध्याचा कालावधी -दि. 1 जानेवारी 2024 पर्यत (सोमवार), सुधारित कालावधी- 17 जानेवारी 2024 (बुधवार)
अंतिम प्रसिध्दी- सध्याचा कालावधी -दि. 5 जानेवारी 2024 पर्यत (शुक्रवार), सुधारित कालावधी- 22 जानेवारी 2024 (सोमवार) याप्रमाणे असणार आहे.

error: Content is protected !!