रिक्षाने धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी 

पाटण / प्रतिनिधी
      सुरूल (ता.पाटण) येथील हणमंत निवृत्ती संकपाळ (वय ४६ वर्षे ) व सौरभ हणमंत संकपाळ (वय 20 वर्ष ) हे सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान आपल्या मोटर सायकल  एम एच ११ एस ०३५९ ने सुरुल वरुन  पाटणला जात  असताना सुरुल (ता. पाटण ) येथील ज्ञानदेव तुकाराम संकपाळ यांच्या घरासमोर पाटणकडून येणारी रिक्षा क्रमांक MH-50 ; M-0670 ही भरधाव वेगात रॉंगसाईडने येऊन रिक्षाचालक अधिक रमेश देसाई (रा. पाटण ता. पाटण ) याने दारुच्या नशेत विरुध्द दिशेने येवून मोटारसायकला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील  हणमंत निवृत्ती संकपाळ यांच्या  पायाला ,तोंडाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे .

    मोटरसायकलच्या पाठीमागे बसलेला त्यांचा मुलगा सौरव हणमंत संकपाळ याला   किरकोळ दुखापत झाली आहे . तर हणमंत संकपाळ यांच्या पायाला , तोंडाला व डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाल्याने त्याना तातडीने उपचारासाठी कराड येथील कृष्णा चारिटेबल  हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे .  याबाबतची फिर्याद सौरभ हणमंत संकपाळ यानी पाटण पोलीस स्टेशनला दिली असुन पाटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहाय्यक फौजदार एस. आर . कोळी करीत आहेत.

error: Content is protected !!