रोहीत ठरला आळते गावच्या यशातील मानाचा तुरा

हातकणंगले/प्रतिनिधी
   आळते (Aalte) (ता. हातकणंगले) येथील रोहित शिवाजी चव्हाण यांची आज भारतीय सैन्यदलात (Indian Army) निवड झाली. सर्वसामान्य कुटुंबातील व वडिलांपासून सैन्याची परंपरा असलेल्या रोहितची भारतीय सैन्यात दलात निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    अथक परिश्रम व सैन्य भरतीचा कायमस्वरूपी रोजचा सहा तास सराव यामुळेच हे यश मिळणे शक्य झाले . अशी भावना रोहितने व्यक्त केली. रोहितचे वडील शिवाजी चव्हाण यांनी देखील भारतीय सेना दलात सेवा बजावली आहे.
रोहितच्या याच्या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण असून अनेक नेते मंडळी व गावकरी यांच्याकडून रोहितवर शुभेच्छांचा वर्षाव होत असुन रोहीतची निवड ही तरूणांसाठी प्रेरणादायी आहे.

error: Content is protected !!