रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांचे वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

इचलकरंजी /ता. ३०

     रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांचे वतीने श्री मोरया गणेशोत्सव मंडळ , (मराठे मिल कॉर्नर ) यांचे व मातोश्री ब्लड बँक , चिकोडी . आणि संजीवन ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले . त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी सर्व उपस्थितांना तसेच रक्तदात्यांना मास्क चे वाटप करण्यात आले.
त्यानंतर श्री हरिदास कला क्रीडा मंडळ कोरोची यांच्या सहयोगाने व कै. बाळासाहेब दाते ब्लड बँक इचलकरंजी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले . शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
सर्व उपस्थितांना व रक्तदात्यांना श्री श्री होमिओ ‘ क्लिनिक यांच्या सहकार्याने रोग प्रतीरोधक औषधी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. दोन्ही शिबिरामध्ये रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने दूध व फळ वाटप करण्यात आले. दोन्हीही कार्यक्रम सोशल डिस्टन्स योग्य तो समन्वय साधत निवडक रोटेरियन च्या उपस्थितीत संपन्न झाला.

error: Content is protected !!