कोल्हापुर / ताः ६ प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ गर्गीस ह्यांनी दादासाहेब मगदूम हायस्कूलच्या शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस लाईव्ह वेबिनारद्वारे मार्गदर्शक वेबिनार आयोजीत केले होते. या आयोजित व्याख्यानमालेत डॉ. नीता नरके यांनी “ कोरोना : समज- गैरसमज आणि घ्यावयाची खबरदारी” , डॉ. जुई कुलकर्णी यांनी “सुजाण पालकत्व” आणि कु. नेहा देसाई यांची व्याख्याने संपन्न झाले.

व्याख्याने युट्यूबवरही प्रसारित करण्यात आली. शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी व्याख्यानमालेत ऑनलाइन सहभागी होऊन मार्गदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी श्रोत्यांच्या शंकांचे निरसन वक्त्यांनी प्रश्न उत्तराद्वारे करण्यात केले. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्रशासनाधिकारी शंकर यादव आणि श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अॅड. अभिजित कापसे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले.
वेबिनारची संकल्पना आणि आयोजन रोटरी क्लब ऑफ गर्गीसच्या अध्यक्षा गौरी शिरगावकर, सचिव अंजली मोहिते यांनी केले. यासाठी दादासाहेब मगदूम स्कूलचे मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद ह्यांचे सहकार्य लाभले.