संघ प्रचारक नाना चंपानेरकर कालवश

वसई/ सूर्यकांत देशपांडे

पालघर जिल्ह्यातील मनोर-जव्हार येथील संघाचे जेष्ठ प्रचारक दिनानाथ रामचंद्र चंपानेरकर तथा नाना यांचे वयाच्या ७१व्या वर्षी दुःखद निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते.

      बालवयापासूनच संघ स्वयंसेवक म्हणून सक्रीय होते . पुढे प्रचारक म्हणून त्यांनी अखेर पर्यंतकार्य केले. पालघर म्हणजेच, तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील जव्हार,शिरूर, खेड, जुन्नर व आंबेगाव परिसरात प्रचारक आणि पुढे कार्यवाह,संघचालक व प्रशिक्षक म्हणून कार्य करताना, त्यांनी परिसरातील ग्रामीण आदिवासी भागात नागरमोडा येथे ” जानकीबाई वनवासी छात्रालय” सुरू केले . त्याद्वारे अनेक विद्यार्थ्यांनां घडवून त्यांना संघ कार्यात सहभागी केले. कट्टर हिंदुत्ववादी असूनही त्यांचा विविधस्तरावर जनसंपर्क होता.१९७५ च्या आणीबाणीत अटक होऊन,नाशिक कारागृहात मिसा कायद्याअंतर्गत अठरा महिने, बंदिवासही त्यांना भोगावा लागला होता.शिस्त प्रिय आणि मितभाषी,तरीही प्रसंगी कठोर भूमिका घेऊन सत्यनिष्ठा जोपासणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.

          त्यांच्या पश्चात पत्नी दीपा,कन्या वैशाली व सुरेंद्र आणि विरेंद्र असे पुत्र असून ते दोघेही संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक आहेत.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .

error: Content is protected !!