रुई गावात जि. प. सदस्या वंदना मगदूम यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

रुई / ताः१५-मनोज अथणे

            हातकणंगले तालुक्यातील रूई येथील आण्णा भाऊ साठे नगर येथे जि.प.सदस्या वंदना मगदूम यांच्या फंडातुन मंजूर झालेल्या अंगणवाडी इमारत, हाफ राऊंड गटर्स, युवकांना व्यायाम साहित्य,पेव्हींग ब्लॉक,तसेच रूई ते साजणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.वंदना मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले. तीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांसाठी माजी सरपंच अभयकुमार काश्मिरे यांनी खास प्रयत्न केले होते. यावेळी हाफ गटर्स कामाचा फलकाचे उद् घाटन प्रा. राजाराम झपाटे सर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

रुई ता. हातकणंगले येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी जि.प.सदस्या वंदना मगदूम,स्वप्ना काश्मीरे, सरपंच उपसरपंच आदी मान्यवर .

          उद्घाटनप्रसंगी पद्माणा हेरवाडे, आप्पासो मुरचिटे,अभय काश्मिरे, संजय मगदूम,सर्जेराव पाटणकर, अशोक आदमाने, राजू कांबळे, सुनील झपाटे,आनंदा झपाटे, हरिबा साठे,किसन साठे, वसंत साठे आदींसह सरपंच, उपसरपंच ग्रा. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!