हातकणंगले तालुक्यातील रूई येथील माऴवाडीनजीक राजमाने हायस्कूलजवळ ३० वर्षीय युवकांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे . बाधीत व्यक्तीचा इचलकरंजी येथील आय.जी.एम येथे त्यांचे स्वॅब तपासणी साठी देण्यात आला होता. सध्या तो आय.जी.एम.येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी आहे .त्यांच्या संपर्कातील पाच व्यक्तीना स्वॅब तपासणी साठी संजय घोडावत येथे पाठविण्यात आले आहे. सदर परिसरात आरोग्य विभाग ,आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी तातडीने परिसर सील केला आहे. कमिटीकडून परिसरात औषध फवारणी करण्यात आली.
कोरोना पॉझिटिव व्यक्तीच्या घरासभोवती परिसर सील करण्यात आला .