हातकणंगले तालुक्यातील रूई येथील सहारा नगर परिसरातील गल्ली नंबर ६ येथील २८ वर्षीय युवकांचा अहवाल आज पॉझिटीव्ह आल्याने एकुण रूग्ण संख्या चार झाली आहे. सदर रूग्ण हा पुर्वी पॉझिटीव्ह रूग्ण आढळलेल्या कुटुंबातीलच आहे. पॉझिटीव्ह रूग्णांस घोडावत कोवीड सेंटर येथे दाखल केले आहे. सदर परिसरात हातकणंगले पोलिस,आरोग्य विभाग,आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी हा भाग यापुर्वीच सील केला असुन खबरदारी चे उपाय सुरू केले आहेत.