रूई युवा ग्रामीण पत संस्थेच्या वतीने इम्युनिटी बुस्टरचे वाटप

रूई ता. २९ ( राकेश खाडे )

रूई युवा ग्रामीण सह.पत संस्थेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत इम्युनिटी बुस्टर चे वाटप करण्यात येत आहे.


रुई गावात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर कणेरी मठाचे अधिपती श्री. काडसिद्धेश्वर महाराज “यांच्या आशीर्वादाने व रुई युवा ग्रामीण सह पत संस्थेच्या विशेष प्रयत्नातून कोरोना आजारावर मात करण्यासाठी व रोग प्रतिकार शक्ती वाढवणेसाठी बेंगलोर येथील डॉक्टर के.जी.श्रीधरन यांनी तयार केलेला ” अँटी बुस्टर डोस” चे वाटप विनामोबदला करण्यात येत आहे. नागरिकांना एक लिटर शुद्ध पाण्याचा बाटलीतून औषध देण्यात येत आहे. सुरुवातीला गावातील सुमारे सहा हजार नागरिकांना हे औषध वाटप करण्यात येणार असून त्यानंतर आणखी चार हजार नागरिकांना असे एकूण दहा हजार नागरिकांना संस्थेच्या वतीने वाटप होणार आहे अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
यावेळी रुई युवा पतसंस्थेचे चेअरमन सागर मुरचिट्टे, व्हा. चेअरमन रावसाहेब मगदूम, पोलिस पाटील नितिश तराळ, भाऊसाहेब फास्के, महावीर हुपरे, संजय आबदाण, सुनिल आबदाण, राजेंद्र चौगुले, असिफ मुजावर, सुनिल शेटाणे तसेच संस्थेचे कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!