रुई /दि:२८-वार्ताहर
रुई (ता. हातकणंगले ) येथे मागील आठवड्यामध्ये कोरोनाचे ७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यातील हुकूमशाह परिसरातील १ कोरोना पॉझिटिव्ह युवक मयत झाल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. मयत तरुणाच्या संपर्कातील इतर आठ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घोडावत कोवीड सेंटरमध्ये पाठविण्यात आले होते. त्यातील आज चार जणांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रूईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११ झाली आहे.
तर हुकूमशाह परिसरात कोरोनाचे तब्बल ५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एक तरुण मयत आहे . परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित परिसर शासनाच्या नियमानुसार तात्काळ कंटेनमेंट ठरवुन सील करणे गरजेचे होते . पण हा परिसर कोणत्याही प्रकारे सील करण्यात आला नसून या परिसरातील लोक संपूर्ण गावभर खुलेआम फिरताना दिसत आहेत.त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य रामभरोसे बनले आहे .
गावातील इतर भागात पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर तातडीने परिसर सील करण्यात आले होते . पण या एकाच परिसरात पाच रुग्ण सापडून देखील कोरोना व्यवस्थापन कमिटी, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे .या दुजाभावमध्ये काही नेते मंडळींच्या मतांचे राजकारण दडलय की काय? अशी चर्चा गावात सुरू आहे.