रुई / दि:२४
रुई ( ता. हातकणंगले ) येथील ३० वर्षांचा तरुण बुधवार दि २२ रोजी दुपारी सी.पी.आर. कोल्हापुर येथे उपचारा दरम्यान मयत झाला.त्यांचा स्वॅब रिपोर्ट शुक्रवार ता . २४ रोजी पॉझिटिव्ह आला असुन गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच झाली आहे. मयत तरुणाला मागील काही दिवसांपासून शारीरिक त्रास जाणवत होता. त्याला तपासणीसाठी सी.पी.आर. येथे बुधवारी दाखल करण्यात आले होते.पण त्याचा उपचारा दरम्यान गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.
मयत तरुणांवर रुई येथेदफन करण्यात आले . यावेळी सुरक्षिततेची योग्य काळजी घेण्यात आली होती .दरम्यान संपर्कातील १० व्यक्तींचे स्वॅब घोडावत कोवीड सेंटर येथे पाठविण्यात आले आहेत.संबंधित परिसर पोलीस प्रशासन आणि कोरोना कमिटी , ग्रामपंचायत यांच्याकडून सील करुन औषध फवारणी करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण बनले आहे .