रुईत कोरोनाचा पहिला रुग्ण , नागरिकात घबराट

हातकणंगले /ता :६

        रुई (ता. हातकणंगले ) येथील सहारानगर मधील गल्ली नं ६ परिसरात कोरोनाचा ५६ वर्षीय पहिला रुग्ण आढळून आला आहे. काही दिवसांपासून त्यास श्वसनाचा त्रास होत असलेने सीपीआर रुग्णलयात दाखल केले होते. त्याचे स्वॅब तपासणी केली असता शनिवारी ता.४ रात्री उशिरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कातील ७ व्यक्तींचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान ग्रामपंचायत, आरोग्य विभाग यांच्या वतीने सदरचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. पण सदर बाधित रुग्णाचे चिकनचे दुकान असून त्या दुकानातुन गावातील चिकन-६५ विक्रेत्याने चिकन खरेदी केले असलेचे समजते . त्यामुळे गावात भीतीचे वातावरण बनले आहे. परिणामी गावातील व्यवस्थापन समितीने ७ जुलै पर्यंत गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवणेचा निर्णय घेतला आहे.

error: Content is protected !!