रुई दि. 13/मनोज अथणे
रूई ता हातकणंगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीजबीलांची होळी करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीजबील वाढीबाबात राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. रूई येथेही स्वाभीमानीच्या वतीने वीजबीलांची होळी करुण आंदोलन करण्यात आले संपूर्ण देशभर लॉकडाउन असल्याने अनेकाना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अश्यातच महाराष्ट्र वीज वितरण कंपणीच्या वतीने ५ ते १५% इतके वाढीव वीजबील आकारणी केली आहे याचा निषेध व्यक्त करीत वीजबीलांची होळी करण्यात आली यासह लॉकडाउन काळातील विजबीले माफ करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तलाठी संतोष उपाध्ये याना निवेदन देउन करण्यात आली.

निवेदनावर दिलीपकुमार जगोजे,सुनिल वडगावे, संजय आबदाण, श्रेणिक मुरचीट्टे, संदीप शेटाणे, आप्पासो चेंडके, बाहुबली मडके, ओंकार चिंचवाडे, प्रतिक खुळ, आदेश बिराजे, प्रतिक धड्डे, अवधुत कुलकर्णी, सुधीर भोकरे नाभिराज हुल्ले आदींच्या सह्या आहेत .