कालचा पॉझिटिव्ह, आजचा निगेटिव्ह. आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार, गावकऱ्यांना नाहक त्रास .

रुई /ता : १८ मनोज अथणे

               शुक्रवार दि. १७ रोजी रुई (ता .हातकणंगले ) येथील गावभागातील पोलिस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल संजय घोडावत कॉलेज येथील हॉस्पिटलमधून प्राप्त झाला होता.त्यामुळे कालपासून गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली होती . पण शनिवार (दि १८) रोजी सकाळी याच आरोग्य विभागाकडून संबंधित पॉझिटिव्ह रुग्णांसह संपर्कातील १९ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा अहवाल देण्यात आला .
          नावातील गोंधळामुळे अशी चूक झाली असल्याचे आरोग्य विभागाकडून खुलासा करण्यात येत आहे . पण अशा बेजबाबदार आरोग्य अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या नातेवाईकांसह संपूर्ण गावकऱ्यांचा जीव अक्षरश: टांगणीलाच लागला होता. अशा कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अशी गंभीर घटना घडू शकते तर सर्वसामान्य जनतेची काय हाल होत असतील . अशी चर्चा सुरु आहे .या घटनेतील संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांची कसून चौकशी व्हावी . अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे . आरोग्य विभागाकडून नावातील चूक अशी घटना रुईबाबत दुसऱ्यांदा झाली आहे पण परमेश्वराच्या कृपाशीर्वादाने गावावरील संकट टळले आहे हे मात्र नक्की.

error: Content is protected !!