रुई / राकेश खाडे
सिंहगड वॉरिअर्स विजेता तर पन्हाळगड वॉरिअर्स उपविजेता

समाजामध्ये एकी असावी असा उद्देश घेऊन मराठा युवा शक्ती या मंडळाचे अध्यक्ष श्री. महेश झपाटे यांनी रुई गावातील मराठा समाजातील तरूणांना तसेच जेष्ठांना एकत्र करत मराठा प्रिमियर लीग २०२१ भव्य नाईट हाफ-स्पीच स्पर्धेचे अतिशय नेटके असे आजोजन केले होते.
स्पर्धेचे उद्घाटन समाजातील जेष्ठ मंडळींच्या व स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुरुवार दि. २३ मार्च २०२१ रोजी करण्यात आले. सुरुवातीपासूनच कमिटीने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत सर्व संघांनी योग्य असे सहकार्य केले व हाफ-स्पीच स्पर्धेवेळी वादावादी होते हा गालबोट पुसून टाकला. या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या संघांना कमिटीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावे देऊन समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या स्पर्धेमध्ये गावातील आठ संघांनी भाग घेतला होता व त्यासाठी संघ मालक म्हणून श्री. प्रताप चव्हाण, श्री. उदय झपाटे, श्री. सुभाष पाटणकर, श्री. गजानन मांगुरे, श्री. सागर गव्हाणे, श्री. सुनील शिंदे, श्री. अजित अपराध, श्री. शितल चव्हाण व श्री. वैभव पोवार यांचे सहकार्य लाभले. तसेच माऊली रोप वाटिकेचे श्री. प्रताप चव्हाण व स्नेहल गारमेंटचे श्री. सचिन लाड यांचे विशेष सहकार्य लाभले.
आंतरराष्ट्रीय IPL प्रमाणे लॉट्स पाडून एका संघाच्या इतर ७ संघाबरोबर सामने होतील व विजेत्या टॉप ४ संघांना उपांत्यफेतीत जाण्याची संधी मिळेल असे वेळापत्रक जाहीर केले होते. या स्पर्धेतील वैशिष्ट्य म्हणजे सागर चव्हाण व सुनील शिंदे यांच्या सिंहगड वॉरिअर्स या संघाने पहिल्या फेरीतील सर्व सामान्याबरोबरच अंतिम ( फायनल ) सामना देखील म्हणजे सलग ९ सामने जिंकून या वर्षीचा मराठा प्रिमियर लीग २०२१ चा प्रथम चषक पटकविला. तसेच गजानन मांगुरे यांच्या पन्हाळगड वॉरिअर्स या संघाने द्वितीय क्रमांक तर सुभाष पाटणकर यांच्या रायगड वॉरिअर्स या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. आणि हो महत्वाचे म्हणजे अमित पाटणकर यांनी अतिशय सुंदर व विनोदी सुत्रसंचलन करून उपस्थित सर्वच प्रेक्षकांचे मनोरंजन केले.