रूकडीत अज्ञातांकडून कोंबड्या चोरीस

हातकणंगले / प्रतिनिधी
      रूकडी (ता.हातकणंगले) येथील ब्रॉयलर जातीच्या चाळीस दिवस वाढ झालेल्या पन्नास कोंबड्या अज्ञातांनी पोल्ट्रीची जाळी उचकटून चोरून नेल्या आहेत . त्याची किंमत पाच हजार रुपये असून याबाबतची फिर्याद पोल्ट्रीमालक शेखर महादेव माने ( रा.रूकडी ) यांनी हातकणंगले पोलिसात दिली आहे .
   अधिक माहिती अशी की , रूकडी (ता. हातकणंगले ) येथील शेखर माने यांचा इंडिया पोल्ट्री हाऊस नावाने कोंबड्याचा पोल्ट्री फार्म आहे. नेहमीप्रमाणे माने रात्री साडेदहा वाजता पोल्ट्रीला कुलुप घालून घरी गेले. दुसरे दिवशी सकाळी पोल्ट्रीमध्ये आल्यानंतर समोरील बाजूची जाळी त्यांना उचकटलेली दिसली. त्यांनी तात्काळ कोंबड्यांचे मोजमाप केले असता पन्नास कोंबड्या अज्ञातांनी चोरुन नेल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. याबाबतची फिर्याद माने यांनी हातकणंगले पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पांडुरंग पाटील करीत आहेत.

error: Content is protected !!