राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी सेवा संस्थेच्यावतीने कर्तृत्ववान नागरिकांचा सत्कार

सुनिल पाटील यांचा सत्कार करताना राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरीक सेवा संस्थेचे अध्यक्ष वाय.एन. बोंगे पाटील, श्रीकृष्ण तांदळे, राजबाबू शेख, चिंतामणी मगदूम व अभिनंदन खोत आदि उपस्थित मान्यवर

रूकडी /ता : ७

              येथील राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी सेवा संस्था यांचे वतीने कर्तृत्वान नागरिकांचा सत्कार सोहळा कर्मवीर कॉलनी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनंदन खोत होते. रूकडी सह पंचक्रोशीतील राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान अशा ज्येष्ठ नागरिक व गुणी विद्यार्थ्यांचा कौतुकसोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो. सदर संस्था महाराष्ट राज्यातील फेस्कॉम या संघटनेशी संलग्न आहे. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल भाऊसाहेब अपराध, कोळी सोनबा, श्रीमती शंकूतला अपराध इं.चा मानाची शाल व श्रीफळ देवून . सत्कार करण्यात आला. याचबरोबर विविध क्षेत्रात विशेष निवड झालेल्या व्यक्तीना यावेळी गौरविण्यात आले. यामध्ये रोटरी क्लब (इचलकरंजी )चा आदर्श शिक्षक पूरस्कार प्राप्त मुख्याध्यापक ढवळे बाबूराव व पेपर विक्रेता सुनिल पाटील ( रुकडी ) यांची नुकतीच हातकणंगले वृत्तपत्र एजंट व विक्रेता संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाल्याने ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा सह्रदय सत्कार केला. विद्यार्थी सोहम सचिन चव्हाण याने महाराष्ट्र टॅलेंट सर्च परिक्षेत जिल्हयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने संघाच्यावतीने त्याचेही कौतूक करण्यात आले. यावेळी सुनिल पाटील यांनी माझा हा सत्कार म्हणजे वडीलधाऱ्यांनी पाठीवर कौतुकाची जणू थाप दिल्याचे समाधान मिळाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ नागरीक संघाच्या वतीने हातकणंगले वृत्तपत्र एजंट व विक्रेता संघाचे उपाध्यक्ष संतोष डुंणूग, सचिव आण्णासो पाटील व सदस्य कुबेर हंकारे इ.चा विशेष सत्कार करण्यात आला. सुरूवातीस कार्यक्रमाची प्रस्तावना पांडूरंग मोरे, अहवाल वाचन आण्णासाहेब जाधव, उपस्थितांचे आभार चिंतामणी मगदूम व सूत्रसंचालन संघाच्या ललिता बोंगे पाटील यानी केले. कार्यक्रमास ‘ कोरोना पाश्र्वभूमीवर सर्व नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले होते. यावेळी संघाचे अध्यक्ष यशवंतराव बोंगे पाटील, सचिव राजबाबू शेख, श्रीकृष्ण तांदळे आदिसह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

error: Content is protected !!