रुकडी / ताः १९
रुकडी (ता. हातकणंगले ) येथील एक महिला कोरोना पॉझीटीव्ह आढळली असून तिच्या थेट संपर्कात घरचे आठ व शेजारील नातेवाईक असे मिळून ३५ लोकांचा समावेश आहे. यातील काही भाजी विक्रेते आहेत. यापूर्वी ही महिला एका खासगी डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली होती. त्यामुळे समूह संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून गावात कोरोनाच्या धास्तीने ‘ हवा टाईट ‘ झाली आहे. दरम्यान सदर महिला बाहेर कुठेही प्रवासास गेली नसून घरीच होती. परंतू दि.१२ रोजी गावातीलच बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी माळभाग (गोसावी गल्लीच्या मागे )येथे उपस्थित होती. त्याठिकाणी २० लोकांपैकी ५ लोक चिप्री( ता. शिरोळ ) येथून आले होते.
दि. १६ अखेर कोणीही आजारी व कोरोना सदृश्य लक्षणे नव्हती. परंतू दि. १७ रोजी उपस्थित असलेल्या महिलेस ताप व धाप याचा त्रास जाणवू लागला. घरच्यांनी गावातीलच एका खासगी डॉक्टरकडे तपासणी साठी नेले,. त्यावेळी लक्षणाबद्दल संशय आल्याने संबंधित डॉक्टरने तातडीने खासगी मेट्रो हॉस्पीटल कोल्हापूर येथे नेण्यास सांगितले.
परंतू सदर हॉस्पीटलने स्वॅब रिपोर्टशिवाय प्रवेश नाकारला. अखेर सदर महिलेस सी.पी.आर कोल्हापूर येथे दाखल केले. तिथे दि.१७ रोजी तिचा स्वॅब घेतला होता व तिचा दि.१९ रोजी कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला. सदर माहिती मिळताच, आरोग्य विभाग व स्थानिक कोरोना समितीने तो संपूर्ण परिसर सॅनटाइज करून प्रतिबंधित केला आहे. ती महिला व तिच्या कुंटूबाच्या संपर्कातील लोकांची यादी करण्याचे काम अद्याप सुरु आहे. महिलेची पूर्वतपासणी केलेल्या त्या डॉक्टरचाही स्वॅब दि.१९ रोजी पाठवला असून, त्या महिलेच्या थेट संपर्कातील ८ असे एकूण ३५ लोकांचा स्वॅब तातडीने घेण्यात आला आहे. या सर्वांना अतिग्रे येथील संजय घोडावत विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. वरील ३५पैकी कांही लोक भाजीपाला विक्रेते आहेत. त्यामुळे त्यांचा अहवाल महत्वाचा असून., दुसऱ्या वेळी गावात कोरोनाचा शिरकाव झालेने धास्तीने ‘हवा टाईट ‘ झाल्याचे चित्र आहे.