मौजे वडगांव येथील श्री. सदगुरू निरंजन महाराज आश्रमाचे सदगुरू विनयानंद महाराज यांचे निधन

हातकणंगले /ता. ३०प्रतिनिधी

     हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील श्री. सदगुरू निरंजन महाराज आश्रमाचे सदगुरू विनयानंद महाराज यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले त्यांचे सहकार क्षेत्रातील व अध्यात्मिक जीवनाचे कार्य थोडक्यात.
    त्यांचा जन्म 12 जानेवारी 1953 सालचा आहे.शिक्षण : SSLC 1968 साली रोज १० कि. मी. पायी चालत पूर्ण केले. त्यांनी शालेय जीवनात सन 1967 मध्ये “थेफ्ट अलार्म” या उपकरणास पहिला पुरस्कार, तसेच ” लिक्विड लेवल कंट्रोल स्विच, मल्टीटाईमर, इमर्जन्सि लॅम्प” इत्यादी उपकरणांची निर्मिती केली होती. शालेय जीवनापासूनच संशोधन वृत्ती होती.


    त्यांनी प्रथमतः नोकरी ग्रामपंचायत मांगूर जिल्हा बेळगाव येथे क्लार्क कम् सेक्रेटरी म्हणून सेवा दिड वर्षे केली. तदनंतर श्री. हनुमान सह. दूध संस्था यळगूड जिल्हा कोल्हापूर येथे रूजू होऊन दूध संकलक ते सचिव, असा सेवा काल 42 वर्षे पूर्ण केला.सर्वांचे सहयोग व मार्गदर्शनामुळे, विविध कार्यपध्दतीमध्ये नियोजन,शिस्त, वक्तशीरपणा आणि कार्यतत्परता यामध्ये आदर्श निर्माण केला आहे. त्याबद्दल संस्थेने 2013 मध्ये सेवानिवृत्तेचेवेळी सन्मानपत्र देवून सत्कार करून गौरव केला. त्यांच्या उतुंग कार्यामुळे सदर संस्थेस महाराष्ट्र शासनाने “सहकार महर्षी” हा पहिला पुरस्कार सन 2012 मध्ये देऊन संस्थेचा गौरव केला.
    त्यांनी अभ्यासाने व कौशल्याने संगणक क्षेत्रातील योगदान : Y2K प्रॅाब्लेम 1997 मध्ये दूर केला, यळगूड येथे COMPUTER LAN SYSTEM 1992 मध्ये यशस्वी केली . तसेच WIFI तंत्रज्ञान सन 2005 साली पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रथम यशस्वी केले. त्यामुळे त्यांची दै पुढारी , सकाळ , तरुणभारत, पुण्यनगरी , महासत्ता , इत्यादी दैनिकांनी पहिल्या पानावर चार कॅालम बातमी देवून प्रसिध्दी दिली होती.
      त्यांनी श्री. पैसाफंड शेतकी सहकारी बँक लि. हुपरी येथे सन 2000 पासून संगणक सल्लागार म्हणून कार्य केले. बँकिंग क्षेत्रात 10 KM परिसरात प्रथमता WIFI तंत्रज्ञानाचा रेडिओ फ्रिक्वेन्शीद्वारे हेड आॅफीस व सर्व शाखेकडील सर्व संगणक यंत्रणा जोडून पुरेपूर सुरक्षित उपयोग केला आहे. याबद्दल अनेक मंत्रीमहोदयांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात ,इतरत्रही सहकारी संस्था व प्रायव्हेट प्रकल्पात वेळोवेळी मार्गदर्शन करीत होते. असे त्यांचे सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य घडले आहे.
सन 1973 मध्ये श्री सद्गुरु निरंजन महाराज यांचेकडून शाम्भवी दिक्षा अनुग्रह घेतला आणि त्यांच्या अध्यात्मीक जीवनाची सुरूवात झाली.सन 1978 मध्ये विवाह होऊन त्यांचे आपत्य चि.विवेक BE COMPUTER पदवी मिळवून पुणे येथे MNC मध्ये सेवेत आहे.अध्यात्मिक सेवा सन 1993 पासून हुपरी येथे सत्संग मंडळ सुरु केले असून दर रविवारी सकाळी 10 ते 12 वेदांत विषयक ग्रंथाचे वाचन, प्राणायम,ओंकार आणि ध्यान असे कार्यक्रम अव्याहतपणे सुरु आहेत.
त्यांची सन 1998 पासून हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रम येथे उत्तराधिकारी “विनयानंद” म्हणून नियुक्ती झाली.अनेक दुर्मिळ ग्रंथांचे प्रकाशन,दोन एकरशेतजमिनीवरआश्रम, ध्यानमंदिर, अन्नक्षेत्र व सभामंटप उभारणी,साधकांचे सहयोगातून दर पौर्णिमा व विविध जयंत्या इत्यादि वार्षिक 24 कार्यक्रम अव्याहतपणे चालु राहतील . अशी फंडस व्यवस्था केली आहे.

       ” समन्वय से समाधि ” हे आश्रमाचे बोध वाक्य असून ” शुध्द,स्थिर,व्यापक आणि परिपूर्ण ” हा कन्सेप्ट आहे.

सदाचार सार साचा । मंत्र दिधला जीवनाचा ।।
सर्व धर्माचा समन्वय । मार्ग दाविला अद्वय ।।
।। विज्ञानातील विध्वंसकता आणि अध्यात्मातील अंधानुकरण दूर करणे ।।
।। शुद्ध आचार विचार आणि कर्म हीच पूजा ।।

हा सारभूत विचार रुजविणे हेच ध्येय आहे. याप्रमाणे त्यांनी जीवन व्यथीत केले. त्यांचा गौरव : सन 1989 ते सन 2016 अखेर विविध संस्था, ट्रस्ट आणि धार्मिक संस्थाकडून रोख रक्कम, स्मृतिचिन्हे देवून आदर्श सेक्रेटरी, उत्तम प्रशासक, धार्मिक सुसंस्कार, जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ सामाजिक पुरस्कार सन २०११ व ज्ञानदिप पुरस्कार सन २०१६ इत्यादि अनेक पुरस्कार देऊन करण्यात आला आहे. त्यांच्या अल्पशा आजाराने जाण्याने श्री सदगुरू निरंजन महाराज आश्नम ,गुरुबंधू व आश्रमाच्या अनुयांमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!