कोल्हापुरातील प्रसिद्ध कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

कोल्हापुरातील प्रसिद्ध लेखक व कादंबरीकार प्रा. कृष्णात खोत (Prof. Krishnat Khot) यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी (Ringan Novel) साहित्य अकादमीचा पुरस्कार (Sahitya Akademi Award) जाहीर झाला. देशातील चोवीस प्रादेशिक भाषांतील साहित्यासाठी पुरस्कार जाहीर झाले असून, मराठी भाषेसाठीचा बहुमान ‘रिंगाण’ला मिळाला आहे.

अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी नवी दिल्ली येथे पुरस्कारांची घोषणा केली. दरम्यान, रोख एक लाख रुपये आणि ताम्रपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून बारा मार्चला पुरस्कार वितरण होणार आहे.

error: Content is protected !!