संजीवनी विद्या मंदिर ध्वजारोहण मंगल पाटील यांच्या हस्ते

चंदुर/ता .१५

         चंदुर ( ता. हातकणंगले ) येथील संजीवनी विद्या मंदिर येथील 74 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. ध्वजारोहण सोहळा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ . मंगल विकास पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
        यावेळी सदस्य विकास पाटील, मुख्याध्यापिका शहनाज सनदी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टंन्सच्या नियमाचे पालन करून व मास्क वापरून समारंभ पार पडला .

error: Content is protected !!