इचलकरंजी/प्रतिनिधी

सन्मती सहकारी बँक (मल्टीस्टेट) इचलकरंजी या बँकेची सन २०२१ ते २०२६ या सालासाठीची पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये संजय चौगुले यांची बिनविरोध संचालकपदी निवड झाली.
मा.सुनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँकेची घोडदौड सुरू आहे. १७ जागांसाठी फक्त १७ च अर्ज भरण्यात आले. यावरून सभासदांचा विद्यमान संचालकांच्यावर असलेला विश्वास सार्थ ठरला आहे. यापूर्वीही बँकेच्या स्थापनेपासून प्रत्येकवेळी निवडणूक बिनविरोध झालेली आहे. तीच परंपरा व विश्वास यावेळीही दिसून आला.
सन्मती सहकारी बँकेच्या स्थापनेपासून बिनविरोध निवडणूकीची परंपरा याही वर्षी सुरूच राहिली. यावेळी बँक मल्टीस्टेट झाल्यामुळे बँकेचा निवडणूक कार्यक्रम केंद्रीय सहकार विभाग, दिल्ली यांच्या मार्फत पार पडण्यात आला.