संजय घोडावत यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार प्रदान

        शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दूरदर्शी शिक्षण तज्ञ म्हणून संजय घोडावत (Sanjay Ghodawat) यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्काराने (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

     संजय घोडावत यांनी घोडावत विद्यापीठ, इंटरनॅशनल स्कूल, पॉलिटेक्निक, आयआयटी व मेडिकल अकॅडमी ची उभारणी अतिग्रे येथे केली आहे. या माध्यमातून सांगली, कोल्हापूर आणि देश विदेशातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सोयीसुविधांनी युक्त दर्जेदार शिक्षणाची संधी निर्माण झाली आहे. संजय घोडावत शिक्षण संकुलात सध्या 16 हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर बेळगाव येथे इंटरनॅशनल स्कूल ची स्थापना करून कर्नाटक राज्यात देखील संजय घोडावत यांनी शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. केजी टू पीएचडी पर्यंतचे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संकुलाची निर्मिती संजय घोडावत यांनी केली आहे.त्यांच्या दूरदृष्टीमुळे विविध क्षेत्रात येथील विद्यार्थी नोकरी, उद्योग धंदा करत आहेत. त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये एज्युकेशन वर्ड यांच्याकडून इंटरनॅशनल स्कूल ला ‘डे बोर्डिंग कम रेसिडेन्शियल स्कूल’ श्रेणीमध्ये महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकाचा तर भारतातून तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
     पीपल आर्ट सेंटर (रजि.) मुंबई या संस्थेला 40 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून कोल्हापुरातील विविध क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या 40 मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 मे रोजी कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापुरात करण्यात आले होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय घोडावत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!