संजय घोडावत इन्स्टिट्यूट ,महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ ( एमएसबीटीई ) आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई ) “निंबस – 2023” या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्ताने बुधवार दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे जिल्हा कोल्हापूर येथे करण्यात आलेले आहे.
या स्पर्धेमध्ये सर्किट एक्सपर्ट, कॅड-बस्टर्स, ट्रबल शुटिंग, पोस्टर प्रेझेंटेशन, ब्रेनी बेंच (क्विझकॉम्पिटिशन) , कोड क्विस्ट – सिपर हंट, इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले असून विजेत्या स्पर्धकास एक लाखापर्यंतची बक्षीसे आणि स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
ही राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा आयटीआय, डिप्लोमा आणि डिग्रीचे प्रशिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.
त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर आणि गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय उपयुक्त साहित्याचे वाटप या कार्यक्रमात केले जाणार आहे.या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट व्ही. गिरी यांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी विविध उद्योजकांनी स्पॉन्सरशिप दिलेली असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि कौशल्यामध्ये वाढ होण्याच्या मुख्य उद्देशाने या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. योगेश पोवार, प्रा. विनायक पावटे आणि टीम परिश्रम घेत आहेत.
या स्पर्धेस संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री. संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य डॉ. विराट व्ही. गिरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
