जागतिक उद्योजक दिन दरवर्षी २१ ऑगस्ट रोजी ‘उद्योजकतेची आणि व्यक्तींना उद्योजक बनण्यासाठी मान्यता’ देण्यासाठी जगभरात साजरा केला जात असून संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या डिग्री प्रथम वर्ष आणि डिप्लोमा तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना उद्योगाची संकल्पना समजावी आणि नवसंकल्पनातून आपले स्वतःचे स्टार्टअप सुरू करावे या उद्देशाने उद्योजकता विकास आणि तंत्रज्ञान व्यवसाय इनकुबेटर, सेल अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक कोल्हापुरी अस्सल चव ‘सलगर अमृततुल्य’ चहाचे संस्थापक, श्री. दादू सलगर हे उपस्थित होते. यावेळी संजय घोडावत इन्स्टिट्यूट प्राचार्य डॉ. विराट गिरी, बेसिक सायन्स विभाग प्रमुख, प्रा. सौ शुभांगी महाडिक, यांत्रिक अभियांत्रिकी विभाग प्रमुख, पी.एम. पाटील, कौशल विकास आणि उद्योजकता विभाग प्रमुख, प्रा. अजय कोंगे, प्रा. समाधान जाधव, प्रा. सचिन कांबळे, प्रा. डी. आर.पाटील, प्रा. मकानदार, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांनी केले
जागतिक उद्योजकता दिवसाचे महत्व सांगून नवोदित, सर्जनशील आणि उद्योगात रिक्स घेणार्यांं उद्योजकांचा सन्मान करण्याचा एक उत्तम दिवस आजचा आहे. जे उद्योजक त्यांचा व्यवसायांसह त्यांच्या समुदायात मोठे बदल करत असतात उद्योजकांचे कठोर परिश्रम आणि समर्पण ओळखण्याची ही एक संधी शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगी हे गुण उतरावेत या उद्देशाने राष्ट्रीय दिवस इन्स्टिट्यूट मध्ये साजरे केले जातात. त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. सर्वाना जागतिक उद्योजकता दिनाच्या शुभेच्छा देवून त्यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्याचा सन्मान चिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
भारत देशामध्ये कोल्हापूरी अस्सल चव ब्रँड ‘सलगर अमृततुल्य’ चहाचे संस्थापक दादू सलगर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही प्रसंगावर आपण विजय मिळवू शकतो. हे त्यांच्या अनुभवातील विविध उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मोसोमबी सरबत स्टॉल ते देशभरात ३५०+ शाखासह प्रसिद्ध झालेला ब्रँड ‘सलगर अमृततुल्य चहा’ त्यांच्या भाषा शैलीत विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन प्रोत्साहित केले. श्री. सलगर म्हणाले नोकरी करणारी व्यक्ती ही स्वतःच कुटुंब चालवू शकतो. परंतु ‘उद्योजक’ उद्योग निर्माण करून शंबर लोकांचे कुटुंब चालू शकतो ही उद्योजकात विशीष्ट ताकत असते. त्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन, उद्योगात वेळोवेळी बदल, त्या उद्योगात ध्यास, नवीन माणस जोडणे नवीन संकल्पनाचा स्वीकार करून ती प्रतेक्षात आचरणात आणणे माणसांचे प्रेम घेणे आणि प्रेम देणे हे अत्यंत महत्त्वाचे गुण उद्योजकाच्या अंगी असणे आवश्यक आहे. सतत कष्ट करीत राहिल्याने एक दिवस विजय आपला नक्की असतो हे लक्षात ठेवले पाहिजे.
प्रमुख मार्गदर्शिकांची मुलाखत आणि सूत्रसंचालन प्रा. आदित्य बुल्ले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग प्रमुख अजय कोंगे यांनी मानले.
सर्वांना जागतिक उद्योजकता दिनाच्या शुभेच्छा संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री. संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी दिल्या आहेत.
