संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे प्रा. समाधान जाधव यांना इंग्रजी विषयात मानाची “पीएचडी पदवी प्रदान”

जयसिंगपूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे इंग्रजी विषयाचे प्रा. समाधान जाधव यांना शिवाजी विद्यापीठा अंतर्गत “सोशल रियालीजम इन द अर्बन प्लेज ऑफ रॉयल विल्यम्स” या संशोधन अभ्यासास मानाची पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. पीएचडीचे प्रमुख गाईड म्हणून प्रोफेसर डॉ. प्रभंजन माने, इंग्रजी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधन कामकाजासाठी वेळोवेळी संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे.

प्रा. समाधान जाधव हे मूलभूत विज्ञान आणि मानविकी विभाग, इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे २०१३ पासुन कार्यरत आहेत. त्यांनी इंग्रजी या विषया मध्ये राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील शोधनिबंध सादर केलेले आहेत. त्यांनी इंजिनीअर विद्यार्थांना व विशेषता ग्रामीण मराठी मध्यमातील विद्यार्थांना इंग्रजी विषयात समुपदेशन करून विद्यार्थ्यांचे करियर घडवले आहे.

प्रा. समाधान जाधव यांना सन्मानित करताना इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. विराट गिरी व इतर

या संशोधनाबद्दल बोलताना प्रा. समाधान जाधव म्हणाले इंग्रजी साहित्याचा वास्तववादी अभ्यास करण्यासाठी मी केलेल्या संशोधनाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांना वास्तववादी द्रष्टिकोन आणि इंग्रजी साहित्य यामध्ये असणारा संबंध लक्षात येईल. माझ्या या यशामध्ये माझे कुटुंबीय, सर्व सहकारी, मित्रपरिवार व घोडावत मॅनेजमेंटचे सहकार्य लाभले आहे.

या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठ चे चेअरमन, संजयजी घोडावत, विश्वस्त, विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!