संजय घोडावत इन्स्टिट्यूट प्रथम वर्ष पदवी इंजीनियरिंग अभ्यासक्रम “प्रारंभ-२०२३” कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक भोसले, कुलसचिव, डॉ. विवेक कायंदे, संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, सीईटी प्रवेश फेरी नुसार प्रवेश झालेले विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, श्री. विनायक भोसले उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना म्हणाले तुम्ही निवडलेले करियर उत्तम प्रकारचे असून त्या करिअरला सक्सेस मिळवणे हे आता सोपे झाले आहे. योग्य मार्गदर्शन आणि उच्च प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये मिळणार आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियानुसार येथे प्रवेश घेऊन आलेल्या सर्व विद्यार्थाना महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सर्व शासकीय शिष्यवृत्ती उपलब्ध असणार आहेत, संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही समाजातील प्रत्येक घटकांना उत्कृष्ट, दर्जेदार शिक्षण आणि तेही माफक फी मध्ये आमच्या जागतिक दर्जाच्या संकुलनात उपलब्ध करून दिले आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना वेळोवेळी वेळ देऊन त्यांचा सर्वांगीण विकास होईल या उद्देशाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. संजय घोडावत ‘पॉलिटेक्निकचे’ इन्स्टिट्यूट मध्ये रूपांतर झालेले असून त्यासाठी परिश्रम घेतलेल्या डॉ. विराट गिरी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव, डॉ. विवेक कायंदे म्हणाले विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न आणि पालकांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी विद्यार्थांनी डोळे उघडे ठेवून सातत्याने अभ्यास करण्याचे कष्ट करायचे आहेत. निवडलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रत्येक घटकाला शंभर टक्के वेळ देऊन ते सातत्याने पूर्ण करणे म्हणजे हमखास यश होय. त्यांनी विद्यार्थांच्या पदवी अभ्यासक्रमास शुभेच्छा दिल्या.
संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि इन्स्टिट्यूट विषयी सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांना आणि पालकांना चार वर्षाच्या डिग्री अभ्यासक्रमाचे नियोजन आणि त्या नियोजनामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याविषयी नियोजनबद्ध मार्गदर्शन करून पालकांची आणि विद्यार्थ्यांची माने जिकली.
या वेळी पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. संजय घोडावत इन्स्टिट्यूटला आमच्या पाल्यांचा प्रवेश घेऊन आम्ही खूप चांगला निर्णय घेतला याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आदित्य बुल्ले यांनी केलेले. आभार प्रा. स्वप्निल थिकने यांनी मानले.
