राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत संजय घोडावत स्कूलच्या विद्यार्थिनींनी मारली बाजी

सीबीएसई मार्फत घेण्यात आलेल्या ‘शालेय राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धा’ हरियाणा मधील पंचकुला या ठिकाणी नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनीनी घवघवीत यश संपादन केले. वैष्णवी सुरेश कोरवी,रिषिता सुरेश संगलगे, धनश्री बजरंग साळुंखे या तिन्ही विद्यार्थिनींनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात सतरा वर्षे मुली सांघिक या गटात सिल्वर मेडल (रौप्य पदक) प्राप्त करत महाराष्ट्र राज्याचे नाव उंचावले. वैष्णवी व रिशीता या इयत्ता 10 वीत तर धनश्री इयत्ता 9 वी मध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहेत. त्यांना प्रशिक्षक अमित अनंतवाड, क्रीडा संचालक श्री विठ्ठल केंचनावर यांचे मार्गदर्शन लाभले. संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, विश्वस्त श्री विनायक भोसले, संस्थापक श्री संजय घोडावत यांनी या विद्यार्थिनींचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!