१४० अंकाने अकांऊट शुन्य होत नाही – पो . नि . संजय मोरे

कोल्हापूर /ता : ११

पोलीस निरीक्षक संजय मोरे

सध्या सोशल मिडीयावरून एक मेसेज व्हायरल होत आहे की , 140 या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसीव्ह करू नका . रिसीव्ह केला तर आपली बँक खात्यातील सर्व रक्कम काढली जाऊन अकाउंट शून्य होते . असे संदेश समाज माध्यमावर फिरताहेत. या संदेशामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे कोल्हापूर सायबर पोलिस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले आहे .
जोपर्यंत आपण ओटीपी अथवा क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्डचे सी. व्ही. व्ही. नंबर शेअर करीत नाही . तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नाही .
जर आपणास 140 अंकाने सुरुवात होणाऱ्या क्रमांकावरून फोन कॉल आला तर गोंधळुन जावु नये. हे क्रमांक टेलिमार्केटिंग करिता दिले गेलेले असतात . मात्र अनोळखी अथवा बँकेतुन बोलतोय असे फोन कॉल आल्यास व ओटीपी सह आपली वैयक्तिक बँक डिटेल्स जर कोणी विचारत असेल तर आपण आपली कोणतीही वैयक्तिक बँक खात्याची माहिती अथवा त्यानंतर ओटीपी देऊ नका . अथवा दिला जाणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पो . नि .मोरे यांनी केले आहे .

error: Content is protected !!