किणी येथे संजय पाटील फौंडेशनने उभारले पन्नास बेडचे कोविड सेंटर

घुणकी / प्रतिनिधी
     कोरोनाचा वाढता फैलाव रोखणेसाठी ग्रामीण भागात गावोगावी कोवीड उपचार केंद्र उभा राहणेची गरज आहे . असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी किणी (ता. हातकणंगले) येथील कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले .
किणी गावातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्ण संख्येची परिस्थिती पाहून किणी हायस्कूल किणी येणे कोविड सेंटर उभारलेल्या उद्घाटन जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या हस्ते झाले .


यावेळी उपजिल्हा जि.प. सदस्या पुष्पाताई आळतेकर , वैद्यकीय अधिकारी उषादेवी कुंभार ,गावचे नेते संजयदादा पाटील व अँड. एन . आर. पाटील , महेंद्रसिंह चव्हाण हिम्मत बहाद्दर सरकार, तालुका वैद्यकीय अधिकारी सुहास कोरे, भादोले वैद्यकीय अधिकारी माहेश्वरी कुंभार , डॉ. मिलींद कुंभार, सुहास माने ,मा .सरपंच बाळगोंडा पाटील, अजित पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संजय पाटील यांनी सांगितले की फौंडेशन मार्फत सर्व सेंटर मध्ये येणाऱ्या रुग्णांना आवश्यक औषधे, दोन वेळचे जेवण, पाणी, चहा , बिस्कीट उपलब्ध करून दिले जाईल . गावात जे रूग्ण आहेत त्यांनी कोविड सेंटर मध्ये दाखल व्हावे . असे अवाहन यावेळी करण्यात आले.
तसेच संजय पाटील यांच्या मागणीप्रमाणे प्राथमिक आरोग्य पथक RTPCR व्हॅन संजय पाटील फौंडेशनच्या वतीने व डॉ. योगेश साळे . उषादेवी कुंभार यांच्या सहकार्याने किणी गावातील रुग्णांच्या कुटूंबातील तसेच इतर लोकांच्यासाठी किणी येथे मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी त्याचा लाभ घ्यावा. कार्यक्रमाचे स्वागत अशोक माळी यांनी केले , तर आभार प्रा. कुबेर पाटील यांनी मानले.
या उद्‌घाटन प्रसंगी उपसरपंच अशोक माळी सर , सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी पंडित, सुनील समुद्रे , हंबीरराव पाटील, प्रा. कुबेर पाटील, अमित दणाणे, बाजीराव घोरपडे, राहुल जाधव,आरोग्य सेवक मोरे,सर्व आशा सेविका, फौंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!