सन्मति विद्यालय तारदाळ एस.एस.सी निकाल 99.26%

तारदाळ /ता. 30

            बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मति विद्यालय तारदाळ एस.एस.सी परीक्षेचा निकाल 99.26 %  लागला आहे. यामध्ये अनुक्रमे स्नेहल राजेंद्र कांबळे (96. 40) प्रवीण बाप्पजी हावळे (95 .40) अनिकेत अरविंद बऩने ( 95 ) % गुण मिळवून या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. एकूण 136 पैकी 135 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष प्राविण्य (52), प्रथम श्रेणी (42), द्वितीय श्रेणी (34) विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले असून संस्कृत विषयांमध्ये मधुरा खोत , प्रफुल्ल खोचरे, साक्षी जाधव, पूर्वा लोखंडे यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून सुयश प्राप्त केले. संस्कृत विषयासाठी अध्यापक सुरज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय समितीचे चेअरमन सुनील पाटील, मुख्याध्यापक  सुरेश बा. चौगुले ,पर्यवेक्षक एस. एस .पाटील ,सर्व अध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

स्नेहल कांबळे 

प्रवीण हावळे 
अनिकेत बऩने

error: Content is protected !!