सारीका टारे गणित मास्टर ट्रेनर पदवीने सन्मानित

हातकणंगले /ता: ३०

         आळते येथील जनसेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बाळासाहेब पाटील (दादा ) हायस्कूलच्या सहाय्यक अध्यापिका सारीका महावीर टारे यांना आय. आय. टी मुंबई , राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांनी गणित प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रशिक्षणाचे आयोजन लोणावळा येथे करण्यात आले होते .

          प्रशिक्षणामध्ये स्वःता उपस्थित राहुन प्रात्यक्षिक दाखविणे व व्हिडीओ लेक्चर घेण्यात आले होते. या सर्व निकषांमध्ये सौ. एस. एम . टारे यांनी विशेष परिश्रम घेऊन नैपुण्य मिळविले . त्याबद्दल देशातील नामांकित आय. आय. टी मुंबई , राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , पुणे व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्याकडुन त्यांना गणित मास्टर ट्रेनर ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. पदवीदान समारंभ नुकताच ऑनलाइन पद्धतीने पार पडला.

           या विशेष यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजयकुमार पाटील , विश्वस्त व संचालक मंडळ मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक- शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला .

error: Content is protected !!