वारणानगर/प्रतिनिधि
येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूर ग्रुप मधील सिनिअर अंडर ऑफिसर सौरभ दीपक चव्हाण याला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर द्वारे दिला जाणारा ‘द कॅप्टन जयसिंग जॉर्ज “ए” जाधव स्मृती सन्मान’ जाहीर झाला. याबद्दल त्याचे अभिनंदन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. प्रकाश चिकुर्डेकर सोबत सुभेदार सुधाकर नवगिरे आणि कॅप्टन डॉ. सुधाकर खोत.

सिनिअर अंडर ऑफिसर सौरभ चव्हाण याने दिल्ली येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय थलसेना कॅम्प मध्ये सहभाग नोंदविला होता. तसेच एनसीसीच्या तीन वर्षाच्या प्रशिक्षणादरम्यान त्याने विविध उपक्रमांमध्ये उस्फुर्त सहभाग घेऊन कार्यक्रमांचे आयोजन आणि एनसीसी परेड चे संचलनही केले आहे. या दरम्यान 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल उदय बारावकर, प्रशासकीय ऑफिसर कर्नल विजयेंद्र थोरात तसेच वारणा विभाग शिक्षण मंडळ अध्यक्ष आमदार डॉ. विनयरावजी कोरे- सावकर, प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर आणि असोसिएट एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ. सुधाकर खोत यांचे मार्गदर्शन लाभले.