सावित्रिबाई फुले रुग्णालय निर्जंतुकरणासाठी दोन दिवस बंद

कोल्हापूर : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील प्रसुती विभाग (लेबररूम) व मॅटर्निटी ऑपरेशन थिएटरचे निर्जतुकिकरण करण्यात येणार आहे. यामुळे शनिवार ३० मार्चपासून ते सोमवार ०१ एप्रिल पर्यंत रुग्णालय बंद ठेवण्यात येणार आहे. यांनतर रुग्णालयाची सेवा पूर्ववत सुरू होणार आहे. तरी नागरिकांनी या कालावधीत सीपीआर व इतर शासकीय रुग्णालयांचा आधार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!