मिणचे ( ता हातकणंगले) येथील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज मधील क्रीडा शिक्षक शिवाजी पाटील यांना महाराष्ट्र राज्य शासन शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य गौरव शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

शिवाजी पाटील हे मांगोली ता राधानगरी येथे सामान्य कुटुंबात जन्मलेले असतानाही त्यांनी आपल्या जिद्द चिकाटी आणि प्रयत्नातून क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावली . क्रीडा प्रशिक्षक, राष्ट्रीय पंच , समन्वयक, आयोजक अशी विविध कामगिरी त्यांनी आज पर्यत यशस्वीरीत्या पर पाडली आहे . त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे .
मागील वर्षी देखील याच प्रशालेचे गणित विषयचे गाढे अभ्यासक, लेखक डॉ दीपक शेटे यांनी हा पुरस्कार मिळावला होता. सलग दोन वर्ष पुरस्कार याच शाळेतील शिक्षकांना मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक एकनाथ आंबोक, संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी एस घुगरे ,सचिव एम.ए परीट यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
