राष्ट्रवादीकडून दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध – वीजबिल माफ करण्याची मागणी

   सावर्डे येथील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बैठकीत बोलताना तालुकाध्यक्ष संभाजीराव पोवार व अन्य पदाधिकारी

हातकणंगले / ताः ६

              हातकणंगले विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक सावर्डे येथील भोसले सरकार यांच्या निवास्थानी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संभाजीराव पोवार होते . यामध्ये केंद्र सरकारच्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात निषेध नोंदविण्यात आला . केंद्र सरकारने या कठीण काळात डिझेल व पेट्रोलच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करून जनतेच्या जखमेवरती मीठ चोळण्याचे काम केले आहे . याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली व लवकरच जनआंदोलन छेडण्याचे ठरवले आहे . त्याचप्रमाणे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, मजूर, छोटे व्यावसायिकांसह सर्वच स्तरातील नोकरदार अडचणीत आले आहेत . अशा वेळी अव्वाच्यासव्वा वीज बिले आली आहेत . तरी महाराष्ट्र शासनाने ही बिले पुर्णतः माफ़ करून जनतेला दिलासा द्यावा . तसेच महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामध्ये प्रमुख भागीदार आहे . तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तालुका व जिल्हा समितीवर योग्य पदावर प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे . आदि ठराव करण्यात आले . स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्य उपाध्यक्ष , समाजभूषण अनिल कांबळे (माणगांवकर ) यांनी केले . यावेळी माजी तालुका अध्यक्ष बी एम माळी, अॅड . आर आर पाटील, परशुराम कीर्तिकर , संजय शिंदे,दत्ताजी भोसले, वसंतराव बोनगाळे,इक्बाल हेरवाडे, अनिल शिंदे, शिवाजीराव भोसले, बाळासाहेब कांबळे , राजू ,आत्माराम बिडकर, राजाराम जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले तर आभार अर्जुन पाटील यांनी मानले .

error: Content is protected !!