आळते येथील राजेंद्र पांडव याचा प्रामाणिकपणा

हातकणंगले /ता : ४

प्रामाणिक राजेंद्र पांडव याचा सत्कार करताना शाखाधिकारी व बँकेचे अन्य कर्मचारी वृंद

       येथील स्टेट बॅक ऑफ इंडीयाच्या एटीएम् च्या मशिन मध्ये विसरलेले दहा हजार रुपये आळते येथील युवक राजेंद्र अशोक पांडव याने प्रामाणिकपणे परत बँकेत केले . त्याचा बँकेच्या वतीने शाखाधिकारी शशिकांत पाटील यांनी सत्कार केला .
आज स्टेट बॅक ऑफ इंडीयाच्या एटीएम् सेंटरमध्ये राजेंद्र पांडव हा पैसे काढणेसाठी गेला होता . त्यावेळी त्याला एक ग्राहक केल्याचे दिसले व त्याला मशिनमधुन काही नोटा बाहेर आलेचे निदर्शनास आले . त्याने ती रक्कम घेवुन तात्काळ बँकेशी संपर्क साधुन दहा हजार रूपये प्रामाणिकपणे परत केले . त्याच्या प्रामाणिकपणाची दखल घेवुन त्याचा बँकेच्या वतीने बक्षीस देवुन सत्कार करण्यात आला . यावेळी आधिकारी रमेश गवस , प्रवीण दिक्षीत यांच्यासह बँकेचे आधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
 

error: Content is protected !!