शाळा बंद , शिक्षण चालू . सेजल पाटील यांची यशस्वी संकल्पना

कोल्हापुर /ताः २७

             कोरोना प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष शाळेतील अध्यापन बंद असले तरी सुद्धा मनपाच्या श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्या मंदीर शाळेतील इ.३री क च्या वर्ग शिक्षिका सौ. सेजल शिवाजी पाटील यांनी विविध शैक्षणिक उपक्रमाची समयसूचकतेने योग्य समन्वय साधत ऑनलाईन शिक्षण पध्दती प्रभावीपणे अंमलात आणली . शाळेत ,वर्गात , व मैदानावर बांगडणारी मुले घरामध्ये एकदम बंदिस्थ झाली .सुरवातीची काही दिवस पालकांनी मुलांना घरामध्ये विविध बैठे खेळ , टि. व्ही , मोबाईल गेम इ. च्या माध्यमातून गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र काही दिवसातच ते मुलांसमोर हतबल झाले . मग वर्गशिक्षकांकडे तक्रारींचा पाठा सुरु झाला .

             सुरवातीला मुलांना सुट्टीत शिक्षण प्रणालीस जोडणे जिकरीचे होते . म्हणून सेजल पाटील यांनी मुलांच्या मानसिकतेचा विचार करून कृतीतून मुलांना सहभागी करून घ्यायला सुरु केले . त्यासाठी त्यांनी घरामध्ये रसना सरबत स्वःता तयार करणे व घरातील सर्वांना देणे . भांडी धूऊन ठेवणे हा उपक्रम घेतला . त्यामधून मुलांना आंनद मिळालाच मात्र पालकांना पाल्याचे कौतूक वाटले . रोजच्या वापरातील कपडे घडी करुन कपाटात ठेवणे , ताट , वाटी पाणी भरुण घेवून जेवायला बसणे. घरातील छोटया कामात आई वडीलांना सोबत घरातील सर्वांना मदत करणे . त्यानंतर मुलांना हळूहळू अभ्यासाकडे घेवून जाताना चित्र काढणे . रंगवणे , वर्तमान पत्रातील कात्रणाची वही बनवणे , घरातील टाकावू वस्तू पासून नवनवीन वस्तू बनवणे . या मध्ये घर , हातपंखा , फुलदानी यामध्ये त्यांना रमवले . कोरोना महामारीचे वास्तव रुप विधार्थांसमोर यावे . यासाठी कोरोना पासून ‘मी माझे असे करतो संरक्षण ‘ या विषयावर ऑनलाईन भाषण स्पर्धा घेतली यामध्ये सहभागी व प्राविण्य प्रात्र मुलांचे कौतुक केले . वर्गातील मुलांचे हस्ताक्षर सुधारणा वर्गाचे आयोजन करत सतत ५० दिवस हा उपक्रम प्रभावीपणे राबवत तो यशस्वी केला . 

                रोजचा अभ्यास वर्गाच्या वॉटसअप् ग्रुपच्या माध्यमातून मुलांना केलेला अभ्यास तपासून त्या सूचना देवू लागल्या . उपक्रमा बदल बोलताना सौ. सेजल पाटील म्हणाल्या इ.३री च्या माझा वर्गातील मुलांना १ ते१५ पर्यंतचे पाठे तोडपाढ आहेत . सोबत वर्गातील मुलांना बाराखाडीचा योग्य वापर करत छोटे इंग्रजी शब्द कसे तयार करायचे यांचे प्रशिक्षण दिले . मुले आता घरातील सर्वांच्या नावांची स्पेलिंग बनवतात . मुलांना शालेय पुस्तकांचे वाटप केले. त्यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त श्री. कल्लशेट्टी यांचे प्रेरणेतून व प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूरचे प्रशासन अधिकारी श्री.एस .के . यादव यांचे संकल्पनेतून व शाळेचे मुख्याध्यापक गुरव यांच्या मार्गदर्शनातून गुगल मिट अँपवर जूलै महिन्यापासून ऑनलाईन शिक्षण सुरू केले . ऑनलाईन पालक मिटिंग घेवून त्यामध्ये पर्यवेक्षक , मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन व स्वःता पालकांचे प्रबोधन करत ऑनलाईन शिक्षणाचे महत्व पटवुन सर्वांना सहभागी करून घेण्यात आले . सर्वच पालकांकडे ऑड्राराईड मोबाईल नसतात तरी शेजारी,गल्लीतील इतर मुलांच्या घरी तासा वेळी बसण्यासाठी प्रबोधन करत वर्गाची १०० % उपस्थिती कायम ठेवली . शाळा बंद पण शिक्षण चालू ही संकल्पना १०० % यशस्वी करताना . त्या नियमित पालक वर्ग व मुलांशी संपर्क साधतात . अध्यापनाचे हे काम करत असताना त्यांनी आपल्या लिविंग रुमलाच क्लासरूम बनवली आहे .एका भिंतीवर फळा , स्पष्ट आवाज जाणेसाठी वायरलेस हेडफोनचा तवापर करतात . स्वःतापेक्षा पालकांना सोयीस्कर वेळ त्यांनी निवडली . पालक घरी असताना म्हणजे सकाळी ८ ते ९ व सांयकाळी ७ या वेळेत त्या शिकवतात .

error: Content is protected !!