घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय समर रिसर्च फेलोशिप साठी निवड

संजय घोडावत विद्यापीठातील केमिस्ट्री विभागाचे विद्यार्थी प्रतीक्षा लंबे(शिरोली दु.) तेजस पाटील यांची भारतातून राष्ट्रीय ‘समर रिसर्च फेलोशिप’ साठी निवड झाली.
इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस बेंगलोर यांच्यामार्फत ही फेलोशिप दिली जाते.या फेलोशिप अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भारतातील आघाडीच्या शिक्षण आणि संशोधन संस्थांमध्ये दोन महिने संशोधन करण्यासाठी बोलावले जाते. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते.


प्रतीक्षा लंबे हिला ही फेलोशिप मिळाली आहे. गुरुनानक देव विद्यापीठ अमृतसर पंजाब येथे ती संशोधनासाठी जाणार आहे. तर एन आय ओ गोवा यांच्याकडून तेजस पाटील याला फेलोशिप मिळाली आहे.भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसियनॉलॉजी संस्थेत तो संशोधन करणार आहे.
निवड झालेले विद्यार्थी एम.एस.सी केमिस्ट्री विषयात शिक्षण घेत असून त्यांना विभागप्रमुख डॉ. पल्लवी भांगे, रिसर्च डीन डॉ.ए.डी. सावंत, डॉ.के.एन.तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल संस्थेचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, अकॅडमीक डीन डॉ.उत्तम जाधव यांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!