साजणी (ता. हातकनंगले) येथील उपसरपंच पदी ग्रामविकास आघाडीच्या सौ मनीषा सुरेश मोघे यांची निवड झाली. सरपंच शिवाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

विद्यमान उपसरपंच सागर सदाशिव पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागेवर निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या निवडणूक कार्यक्रमात ग्राम विकास आघाडीतर्फे सौ. मनीषा मोघे तर त्यांच्याविरोधात राजश्री शाहू आघाडी तर्फे अंजली पाटील यांनी अर्ज दाखल केला.
यावेळी झालेल्या मतदानात दोघांनाही समान सात मते मिळाली. त्यामुळे सरपंचांनी आपल्या अधिकारातील एक मत सौ मनीषा मोघे यांना दिले. त्यामुळे या पदावर मोघे यांची सात विरुद्ध आठ मतांनी निवड झाली. ग्रामविकास अधिकारी कविता बाबर यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी सरपंच शिवाजी पाटील, सागर पाटील, सचिन कोळी, अमर कांबळे, सुनील पाटील, उदय शेटे, सचिन कांबळे, दिनकर कांबळे, संदीप पाटील, सुरेश मोघे, अमर पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती