सार्थक सागर कटके याची नवोदय विद्यालयात निवड

हातकणंगले / प्रतिनिधी
आळते (ता. हातकणंगले) येथील बाळासाहेब पाटील ( दादा) हायस्कूलचा विद्यार्थी चि. सार्थक सागर कटके याची कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली . त्याचा हायस्कुलच्या वतीने सत्कार करण्यात आला. सार्थकने अथक परिश्रम करून घवघवीत यश संपादन केले आहे .

बाळासाहेब पाटील (दादा) हायस्कूलच्या वतीने सार्थक कटके याचा सत्कार करताना मुख्याध्यापक , शिक्षकवृंद व उपस्थित अन्य मान्यवर


सार्थक यास त्याचे आई, वडील, संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, शालेय समितीचे अध्यक्ष , माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक , पर्यवेक्षक , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका, विभाग प्रमुख ,विषय शिक्षक व सर्व स्टाफ.चे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!