शरद इंजिनिअरिंगमधील सात विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांची निवड

अविष्कार २०२३ स्पर्धा : विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेत सहभागी

           यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांच्या सात संशोधन प्रकाल्पांची अविष्कार २०२३ च्या विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अंतर्गत ‘अविष्कार २०२३’ हि प्रोजेक्ट स्पर्धा सातारा येथे झाल्या. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंध्दुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील ४९ महाविद्यालयातून १६० पेक्षा अधिक संघ सहभागी झाले होते.

यड्राव येथे शरद इंजिनिअरिंगमध्ये अविष्कार प्रोजेक्ट स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांचा सन्मान करताना अनिल बागणे आदी.

यामध्ये स्पर्धेत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अथर्व जोशी, समीर मोमीन, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील प्राजक्ता जाधव, साक्षी कुलकर्णी, मेकॅट्रॉनिक्स विभागातील सद्दाम मुल्लाणी, आर्टीफिशल इंटेलिजेन्स अॅण्ड डेटा सायन्स विभागातील तेजस्वीनी दानवाडकर तर इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागातील प्रथमेश खोराटे या विद्यार्थ्यांचे प्रकल्प विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाले आहेत. विद्यार्थ्यांना डॉ. एस.टी. जाधव, डॉ.एस.एस. गुरव, प्रा. एएसएन हुसेनी, प्रा. व्ही.व्ही. खंदारे, प्रा. मंगेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्याच्या नाविण्यपूर्ण वैज्ञानिक प्रतिभा ओळखून त्यांना संशोधनक्षमता विकसित करण्यासाठी संधी प्रदान करणे. तसेच संशोधनाचा दर्जा वाढविण्यासाठी संशोधकांमध्ये स्पर्धात्मकता निर्माण करणे. या उदिष्टांसह विद्यार्थ्यामध्ये संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात आविष्कार-महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ संशोधन अधिवेशन सुरु केले आहे. यामध्ये शरद इंजिनिअरिंगचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी यश संपादन करीत आले आहेत.

अविष्कारचे महाविद्यालयीन समन्वयक डॉ. शरद जाधव, प्रा. धनश्री बिरादार यांच्यासह महाविद्यालयातील डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यी, प्राध्यापक यांचे अभिनंदन केले.

 

error: Content is protected !!