यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या मुलांची विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

वारणानगर, ता.24
येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धत १७ व १९ वर्षाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धा कोल्हापूर येथे संपन्न झाल्या. संघ विभागीस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. १७ वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक- विवेक सुभाष घेवारी. १९ वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक- आदित्य विकास मोहिते, शिवराज बाजीराव सूर्यवंशी, प्रथमेश संजय वाळके. तर १९ वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक संध्याराणी संजय सूर्यवंशी या सर्व खेळाडूंची सातारा येथे होणाऱ्या विभागीस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील मुलांच्या तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघा समवेत प्राचार्य डॉ प्रकाश चिकुर्डेकर, प्रा. क्रांतीकुमार पाटील.


या खेळाडूना श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे- सावकर, प्रशाकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांचे प्रोस्ताहन लाभले. क्रीडा संचालक प्रा. आण्णासो पाटील, क्रीडा शिक्षक, प्रा. क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!