कुंभोज मधील युवकाची मुंबई पोलीस दलामध्ये निवड

मजले / प्रतिनिधी
कुंभोज (ता. हातकणंगले) येथील अभिजीत बाबासो जडे या युवकाची मुंबई पोलीस शिपाई पदी निवड झाली आहे. अभिजीत गेली अनेक वर्ष पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता. कित्येक वेळा अपयश येऊन सुद्धा जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांने आपले स्वप्न पूर्ण केले.


यासाठी अभिजीतला पोलीस दलात कार्यरत असलेले त्याचा मोठे भाऊ गणेश जडे (कोल्हापूर पोलीस) आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रवीण नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.
अभिजीतचे वडील हे ग्रामपंचायत कुंभोज येथे शिपाई म्हणून कार्यरत होते. अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांची दोन्ही मुले पोलीस दलात नियुक्त झाल्याने कुंभोज सह परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या निवडीमुळे कुंभोज परिसरातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये अत्यंत उत्साहचे वातावरण निर्माण झाले आहे.
निकाल समजताच सूर्योदय गणेशोस्तव मंडळाचे कार्यकर्ते नागरिक, नातेवाईक तसेच मित्रमंडळींनी आनंद उत्सव साजरा केला. ग्रामपंचाय कुंभोज यांच्याकडून देखील अभिजीतचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!