हातकणंगले / ताः ८

सामाजिक कार्याचा वारसा जपत आदिवासी लोकांच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केलेले व त्यांच्या कार्याची दखल घेवुन आशियाचे नोबेल समजल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आलेले डॉ.प्रकाश बाबा आमटे यांच्यासोबत संजय घोडावत पॉलिटेक्निक व डॉ.ज्ञानेश्वर मुळे फौंडेशनच्या वतीने मोफत ऑनलाइन संवाद वेबिनार आयोजित केला आहे . वेबिनार दि.११ जुलै २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता होणार असुन या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे . तरी याचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन प्राचार्य विराट गिरी यांनी केले आहे .
थोर समाजसेवक डॉ.बाबा आमटे यांचे ते द्वितीय चिरंजीव आहेत . गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा दुर्गम भागातील गावामध्ये त्यांनी आपल्या वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा जपत आदिवासी लोकांच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले आहे . तसेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे . २०१४ साली त्यांच्या जीवनावर आधारित डॉ.प्रकाश बाबा आमटे:द रिअल हिरो हा त्यांचा मराठी चित्रपट व हेमलकसा हा हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.
तरी इच्छुकांनी खालील लिंक वर जाऊन आपले नाव, ई-मेल व संपर्क क्रमांक इत्यादी माहिती भरून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्यानांच या संवाद वेबिनार ची लिंक पाठवली जाईल.
रजिस्ट्रेशन लिंक:
https://event.webinarjam.com/channel/Regi_Anandwan
रजिस्ट्रेशन पूर्ण झाले नंतर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी लिंक तुमच्या इमेल वर लगेच आणि कार्यक्रम सुरू होण्याअगोदर १५ मिनटे अगोदर येईल याची नोंद घ्यावी.
ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा अधिक माहितीसाठी संपर्क:
Mr.P.M.Patil-
9890674151
Mr.V.S.Teli
9766020784
Mr.S.V.Chavan
9730765420
